"माझं म्हणणं मी कमिटीसमाेर मांडेल मिडियामध्ये बाेलायला ऑथराईझ नाही", पूजा खेडकरांचे वक्तव्य
By नंदकिशोर नारे | Updated: July 12, 2024 16:25 IST2024-07-12T16:24:41+5:302024-07-12T16:25:32+5:30
दुसऱ्या दिवशीही त्यांनी ‘माझं म्हणणं मी कमिटीसमाेर मांडेल, मिडियामध्ये बाेलायला ऑथराईझ नसल्याचे सांगून पत्रकारांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांवर चुप्पी साधली.

"माझं म्हणणं मी कमिटीसमाेर मांडेल मिडियामध्ये बाेलायला ऑथराईझ नाही", पूजा खेडकरांचे वक्तव्य
वाशिम : विविध विषयाबाबत वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर वाशिम येथे ११ जुलै राेजी रुजू झाल्यात. यावेळी पत्रकारांनी त्यांची भेट घेतली असता ‘मी ऑथराईझ नाही मी तुम्हाला काही सांगायला’म्हटले. आज १२ जुलै राेजी पत्रकारांनी त्यांची नियाेजन भवनात भेट घेतली असता दुसऱ्या दिवशीही त्यांनी ‘माझं म्हणणं मी कमिटीसमाेर मांडेल, मिडियामध्ये बाेलायला ऑथराईझ नसल्याचे सांगून पत्रकारांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांवर चुप्पी साधली.
परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर नियाेजन भवनातील जिल्हाधिकारी यांच्या कक्षातून बाहेर जाण्याकरिता निघाली असता पत्रकारांनी त्यांना भेटून त्यांनी केलेल्या व्हीआयपी मागण्या, परिक्षा उतीर्ण हाेण्यासाठी बनावट दृष्टीदाेष, इतर मागासवर्गिय प्रमाणपत्रांबाबत तसेच ईतरही चर्चेत असलेल्या विषयांवर विचारणा केली असता त्या केवळ माझं जे म्हणणे आहे ते मी कमिटीसमाेर मांडेल, मिडियामध्ये बाेलायला ऑथराईझ नाही या दाेन वाक्य व्यतिरिक्त काहीही बाेलल्या नाहीत. काही पत्रकारांनी चिडून मॅडम आपण केवळ दाेनच वाकय बाेलत आहेत, हे आपणास माहिती नाही काय? असा प्रश्नही केला. त्यावरही त्यांनी मी तुम्हाला काहीही सांगायास ऑथराईझ नाही असे सांगून तेथून निघून गेल्यात.
सरकारने कमिटी नेमली आहे
पूजा खेडकर यांना पत्रकारांनी मॅडम आपल्याबाबत जे प्रकरण घडलेले आहेत, त्याबाबत आपण काहीच का उत्तर देत नाहीत. यावर पूजा खेडकर यांनी याकरिता सरकारने कमिटी नेमली आहे. त्यांना त्यांचे उत्तर मी देईन, मला तुम्हाला किंवा काेणालाच काही सांगण्याची परवानगी नाही असे सांगितले.