मी फक्त संविधानाला मानतो; भारतात मी कुठेही काम करण्यास तयार- समीर वानखेडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 14:46 IST2022-08-24T14:46:43+5:302022-08-24T14:46:56+5:30
सर्वच केसेस माझ्यासाठी महत्वाच्या होत्या, असं एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं.

मी फक्त संविधानाला मानतो; भारतात मी कुठेही काम करण्यास तयार- समीर वानखेडे
वाशिम- भारत सरकारने मला अनेक काम करण्याच्या संधी दिल्या आहेत. त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. सर्वच केसेस माझ्यासाठी महत्वाच्या होत्या, असं एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं.
माझ्यावर कितीही आरोप झाले तरी मी फक्त संविधानाला मानतो, असं समीर वानखेडे यांनी सांगितलं. मला भारतात कुठेही कामाकरिता पाठवल्यास मी काम करणार असल्याचंही समीर वानखेडे यांनी स्पष्ट केलं आहे. ते वाशिम येथे आले असता पत्रकार परिषदमध्ये बोलत होते.