दोन वाहनांच्या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी!
By Admin | Updated: July 16, 2017 20:28 IST2017-07-16T20:28:40+5:302017-07-16T20:28:40+5:30
कारंजा लाड : नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील शेवती फाट्यानजिक ट्रक व स्विप्ट डिझायर या वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात स्विप्ट डिझायरमधील पती-पत्नी गंभीर जखमी झाले.

दोन वाहनांच्या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी!
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील शेवती फाट्यानजिक ट्रक व स्विप्ट डिझायर या वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात स्विप्ट डिझायरमधील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना १६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार पंकज माडाराम यादव हे त्यांची पत्नी निलम आणि मुलगी तनिष्का यांच्यासह (एम.एच ४९ बी २५७४) या क्रमांकाच्या वाहनाने नागपूरहून पुणे येथे चालले होते. यादरम्यान समोरून येणाऱ्या (एम.एच २० बी.टी. १९४८) या क्रमांकाच्या ट्रकने यादव यांच्या वाहनाला जबर धडक दिली. यात पंकज आणि निलम हे दोघेही गंभीर जखमी झाले; तर त्यांची एक वर्षाची मुलगी तनिष्का या अपघातात सुखरूप बचावली. कारंजा ग्रामीण रूग्णालयात दोन्ही जखमींवर प्राथमिक उपचार करून अमरावतीच्या रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.