दुचाकी अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:40 IST2021-03-25T04:40:17+5:302021-03-25T04:40:17+5:30

कारंजा लाड : दुचाकी अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना २४ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान कारंजा-मुर्तिजापूर मार्गावरील ...

Husband and wife seriously injured in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी

दुचाकी अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी

कारंजा लाड : दुचाकी अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना २४ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान कारंजा-मुर्तिजापूर मार्गावरील श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयानजीक घडली.

दशरथ शंकर काळे (६०) व संगीता दशरथ काळे (४५) असे अपघातात जखमी झालेल्या पती-पत्नीची नावे असून ते कारंजा तालुक्यातील वापटी-कुपटी येथील रहिवासी आहेत. अपघातातील जखमी काळे दाम्पत्य आपले कारंजा येथील काम आटोपून गावाकडे परत जात असताना मार्गातील धाबेकर महाविद्यालयानजिक गाय दुचाकीच्या आडवी आल्याने अपघात घडला. या अपघातात संगीता काळे यांच्या डोक्याला व कंबरेला, तर दशरथ काळे यांनाही गंभीर इजा झाली. जखमी अवस्थेत रुग्णवाहिकाचालक शंकर रामटेके यांनी प्राथमिक उपचारासाठी त्यांना कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर अपघाताची पोलिसांत नोंद झाली नाही.

Web Title: Husband and wife seriously injured in a two-wheeler accident