तहसीलदार कार्यालयासमोर नुकसानग्रस्त नागरिकांचे साखळी उपोषण
By संतोष वानखडे | Updated: November 20, 2023 17:54 IST2023-11-20T17:52:12+5:302023-11-20T17:54:18+5:30
अतिवृष्टीमुळे घराची पडझड व अन्नधान्याच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, याकरिता नुकसानग्रस्तांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण.

तहसीलदार कार्यालयासमोर नुकसानग्रस्त नागरिकांचे साखळी उपोषण
संतोष वानखडे,लोकमत न्यूज नेटवर्क,वाशिम : मानोरा तालुक्यातील भुली येथील अतिवृष्टीमुळे घराची पडझड व अन्नधान्याच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, याकरिता २० नोव्हेंबरपासून नुकसानग्रस्तांनी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले.
नुकसान भरपाईसाठी नियमाला बगल देऊन कोणत्याही प्रकारचा पंचनामा न करता मर्जीनुसार बोगस लाभार्थी यांना आर्थिक लाभ देऊन शासनाच्या निधीमध्ये अफरातफर केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. नुकसानग्रस्तांना भरपाई दिल्याच्या लाभार्थी यादीची चौकशी व्हावी, या मागणीसाठी यापूर्वी नागरिकांनी तहसील कार्यालय व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
परंतु, प्रशासनाने दखल न घेतल्याने २० नोव्हेंबरपासून तहसील कार्यालय येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, दोषींविरूद्ध कडक कारवाई करावी आणि बोगस लाभार्थी वगळावेत, अशी मागणी करण्यात आली.शिवाय नागरिकामध्ये संतापाचे वातावरण दिसुन येत आहे.