शेकडो शेतकरी तहसीलवर धडकले
By Admin | Updated: July 23, 2014 00:00 IST2014-07-22T22:08:36+5:302014-07-23T00:00:08+5:30
दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

शेकडो शेतकरी तहसीलवर धडकले
किन्हीराजा : किन्हीराजा येथून जवळच असलेल्या कवरदरी येथे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शासनाने पेरणी करीता मदत देण्याच्या मागणीसाठी येथील शेकडो शेतकरी तहसीलवर जाऊन तहसीलदार यांना निवेदनाव्दारे मागणी केली.
कवरदरी परिसरात अत्यल्प पाऊस झाला व शेतकर्यांनी १५ ते २0 दिवसांपूर्वी पेरण्या केल्या तर काही शेतकर्यांनी पेरणी केलीच नाही. पेरणी केलेल्या शेतातील पिके उगवलीच नसल्याने २१ जुलै रोजी कवरदरी येथील सरपंचा उज्वला रमेश कांबळे, उपसरपंच वेणुताई पुंडलीक गिर्हे यांच्यासह २२0 शेतकरी मालेगाव तहसीलला निवेदन घेवून गेले होते. निवेदनात आमच्याकडे दुबार पेरणी करिता पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे इत्यादी शेतकर्यांना दुबार पेरणी करिता शासनाने सर्व्हे करु मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनावर शेकडो शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत