‘एमआयडीसी’त शेकडो एकर जागा विनावापर पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:27 IST2021-07-08T04:27:38+5:302021-07-08T04:27:38+5:30
वाशिम शहरानजीक वसलेल्या ‘एमआयडीसी’त चकचकीत रस्ते, आवश्यक ठिकाणी विद्युत पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र ‘एमआयडीसी’त घेऊन ...

‘एमआयडीसी’त शेकडो एकर जागा विनावापर पडून
वाशिम शहरानजीक वसलेल्या ‘एमआयडीसी’त चकचकीत रस्ते, आवश्यक ठिकाणी विद्युत पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र ‘एमआयडीसी’त घेऊन ठेवलेले भूखंड बांधून त्यावर उद्योग सुरू करण्याबाबत अनेकांमधून उदासिनता बाळगली जात आहे. दरम्यान, भूखंडांवर उद्योग सुरू न केल्यास दर पाच वर्षांनंतर भूखंड परत घेऊन त्याचा पुन्हा लिलाव करण्याची पद्धत आहे. याकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, नव्या उद्योजकांची इच्छा असूनही आणि शेकडो एकर जागा विनावापर पडून असतानाही भूखंड मिळणे अशक्य झाल्याने त्यांचा हिरमोड होत आहे.
.......................
कोट :
‘एमआयडीसी’त विनावापर पडून असलेले भूखंड परत घेण्याची कार्यवाही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करायला हवी. याप्रकरणी चाैकशी करून भूखंड परत घेण्यासंबंधीचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात येतील.
- शन्मुगराजन एस.
जिल्हाधिकारी, वाशिम.