श्रद्धेय बाबूजींना विनम्र अभिवादन
By Admin | Updated: July 3, 2017 02:27 IST2017-07-03T02:27:53+5:302017-07-03T02:27:53+5:30
वाशिम: श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी लोकमतच्या वाशिम येथील कार्यालयात त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले.

श्रद्धेय बाबूजींना विनम्र अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी लोकमतच्या वाशिम येथील कार्यालयात त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले.
श्रद्धेय बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त वाशिम येथील लोकमत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात लोकमतचे वितरक राजेंद्र सकलेचा, शहर प्रतिनिधी शिखरचंद बागरेचा यांच्या हस्ते बाबूजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लोकमत वाशिम कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.