किती ही लूट? मुख्य भाजीबाजारात कांदा ३०, तर घराजवळ २० रुपये किलो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST2021-07-31T04:40:51+5:302021-07-31T04:40:51+5:30
भाजी बाजारात एकाच ठिकाणी अनेक भाजी विक्रेते बसलेले असल्याने बहुतांश ठिकाणी समसमान भाव दिसून येतात. एखादी भाजी ताजी व ...

किती ही लूट? मुख्य भाजीबाजारात कांदा ३०, तर घराजवळ २० रुपये किलो !
भाजी बाजारात एकाच ठिकाणी अनेक भाजी विक्रेते बसलेले असल्याने बहुतांश ठिकाणी समसमान भाव दिसून येतात. एखादी भाजी ताजी व फ्रेश असल्यासच अपवाद. परंतु घरासमाेर असलेल्या भाजी विक्रेत्यांकडून बाजारात मिळणाऱ्या भाजीपाल्याचे भाव निम्या दरात आढळून आले आहेत. केवळ बाजारात फ्रेश व ताजी भाजी मिळते म्हणून अनेक नागरिक बाजारात जातात परंतु त्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत असल्याचे आढळून आले आहे. भाजी बाजारात काेणतीही भाजी २० रुपये पाव आहे, तीच भाजी घराजवळ १० ते १५ रुपयाने मिळतेय.
...........
पाटणी चौकात काेबी ८० रुपये, इतर ठिकाणी ४० रुपये किलो
वाशिम शहरातील पाटणी चाैक परिसरात अनेक वर्षापासून भाजी बाजार भरविण्यात येताे. तसेच बाजूला महात्मा फुले भाजी मार्केट आहे. येथे मिळणाऱ्या भाज्यांचे भाव २० रुपये पाव, ८० रुपये किलाे आहेत. हेच भाव घराजवळील भाजी विक्रेत्यांकडे कमी दिसून येतात.
..........
पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात !
रात्रंदिवस शेतात राबून शेतकरी भाजीपाला उत्पादन घेतात. हर्रासीमध्ये नेल्यावर त्यांना माती माेल भाव मिळताे, मात्र ताेच भाजीपाला लघु व्यावसायिक उच्च दरात विकून माेठ्या प्रमाणात नफा कमावितात.
अनेक शेतकऱ्यांनी हर्रासीमध्ये माल न विकता आता स्वताहून विकणे सुरु केले आहे. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना हाेत आहे. काही शेतकरी अद्यापही हर्रासीमध्ये माल विकत असल्याने त्यांच्या हाती तुटपुंजे पैसे येत आहेत.
पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात!
...............
अर्धा-पाव किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही!
अर्धा एक किलाे भाजी हर्रासीमध्ये घेण्यास गेल्यास व्यापारी शक्यताेवर भाजीपाला देण्यास नकार देतात. पर्यायी भाजी बाजारातून महाग भाजीपाला घ्यावा लागताे
- अर्चना काळे, वाशिम
घराजवळ येत असलेल्या भाजीवाल्याकडून भाजीपाला दरराेज लागेल तेवढाच घेण्यात येताे. बाजारात गेल्यास आठवडाभराचा भाजीपाला महाग पडताे.
- पिंकी सुखदेव, वाशिम
..........
एवढा फरक कसा?
हर्रासीमधून भाजीपाल्याची बाेली लावल्यानंतर हर्रासी देण्यापासून तर दुकानापर्यंत भाजीपाला आणण्यासाठी खर्च येताे. या खर्चासह भाजीपाल्याचे भाव ठरविण्यात येतात.
गणेश माेहळे, व्यापारी
हर्रासीमधील भावात व चिल्लर विक्रीच्या भावात तफावत असण्यामागील कारण भाजीपाला व्यापाऱ्याने खरेदी केल्यानंतर त्याला वाहतूक खर्च लागताे. तसेच लवकर भाजीपाला विकल्या न गेल्यास ताे खराब हाेण्याची शक्यता असते.
रुपेश खानझाेडे, व्यापारी
..........