वादळवारा, गारपिटीमुळे मेडशी परिसरात घरे, झाडांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 16:32 IST2021-05-10T16:31:11+5:302021-05-10T16:32:01+5:30
Washim News: वादळवारा, गारपिटीमुळे मेडशी परिसरात घरे, झाडांची पडझड झाली.

वादळवारा, गारपिटीमुळे मेडशी परिसरात घरे, झाडांची पडझड
मेडशी : वादळवारा आणि गारपिटीमुळे मेडशी परिसरात फळबाग, घर व झाडांची पडझड झाली असून, तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी सरपंच शेख जमीर शेख गणीभाई यांनी सोमवार, १० मे रोजी महसूल प्रशासनाकडे केली.
गत तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, मेडशी परिसरात ९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास वादळवाºयासह अवकाळी पाऊस व गारपिट झाली आहे. यामुळे आंब्याची झाडे कोलमडून पडली, काहीचंय घरावरील टीनपत्रे उडून गेली तर अकोला-वाशिम महामार्गावर झाड उन्मळून पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्याकरिता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गव्हाने, महाले, जमादार सुरेंद्र तिखिले, पोलिस नाईक संतोष गायकवाड आणि वनपाल यू आर राऊत यांनी प्रयत्न केले. वादळीवाºयामुळे फळबागेला व फळझाडांना जबर फटका बसला तसेच उन्हाळी मूगाचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.े काही घरांची पडझड झाली आहे. नुकसानाचा महसूल विभागाकडून पंचनामा व्हावा, याप्रकरणी आमदार अमित झनक यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सरपंच शेख जमीर यांनी केली.