अबब...घरगुती वीजमीटरचे देयक तब्बल १.२० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 02:26 PM2018-02-22T14:26:28+5:302018-02-22T14:28:05+5:30

वाशिम: घरगुती वीज वापरासाठी जोडणी घेतलेल्या ग्राहकाला महिन्यासाठी तब्बल १ लाख २० हजार ८० रुपये देयक आकारण्याचा प्रताप वाशिम महावितरणच्या कार्यालयाने केला आहे.

Household electricity meter bill of 1.20 lakh | अबब...घरगुती वीजमीटरचे देयक तब्बल १.२० लाख

अबब...घरगुती वीजमीटरचे देयक तब्बल १.२० लाख

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्यक्षात नावात बदल झाल्याने इतरच ग्राहकाचे देयक आसराबाई सिरसाट यांना येत आहे. त्यांचा मुलगा प्रत्येक महावितरणच्या कार्यालयात जाऊन येत असलेल्या आगाऊ देयकात दुरुस्ती करून घेत आहे. जानेवारी २०१८ या महिन्याच्या वीज वापरासाठी त्यांना ८ फेब्रुवारीला तब्बल १ लाख २० हजार ८० रुपयांचे वीज देयक देण्यात आले आहे.

वाशिम: घरगुती वीज वापरासाठी जोडणी घेतलेल्या ग्राहकाला महिन्यासाठी तब्बल १ लाख २० हजार ८० रुपये देयक आकारण्याचा प्रताप वाशिम महावितरणच्या कार्यालयाने केला आहे. आसराबाई दयाराम सिरसाट, असे वीज ग्राहकाचे नाव आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २०१६ पासून त्यांना अशाच प्रकारे आगाऊ देयक आकारण्यात येत असून, प्रत्येक महिन्यात सदर ग्राहक महावितरणच्या कार्यालयात जाऊन देयकात दुरुस्ती करून घेत आहेत. 

वाशिम शहरातील मालसाबपुरा परिसरात राहणाºया आसराबाई दयाराम सिरसाट यांच्याकडून जुन्या वापरातील ९८००१८५६०९ क्रमांकाचे मीटर असताना; त्यांच्या नावे येत असलेल्या देयकावरील मीटरचा क्रमांक ९८००१८५६१५, असा आहे. प्रत्यक्षात नावात बदल झाल्याने इतरच ग्राहकाचे देयक आसराबाई सिरसाट यांना येत असून, त्यांचा मुलगा प्रत्येक महावितरणच्या कार्यालयात जाऊन येत असलेल्या आगाऊ देयकात दुरुस्ती करून घेत आहे. डिसेंबर २०१६ पासून सुरू असलेला हा प्रकार अद्यापही कायमच आहे.  त्यातच डिसेंबर २०१८ या महिन्याच्या वीज वापरासाठी आसाराबाई सिरसाट यांना १लाख १७ हजार ९६० रुपये देयक आले आणि त्यात दुरुस्ती केल्यानंतर त्यांनी ४४०० रुपये देयकही भरले. त्यानंतर जानेवारी २०१८ या महिन्याच्या वीज वापरासाठी त्यांना ८ फेब्रुवारीला तब्बल १ लाख २० हजार ८० रुपयांचे वीज देयक देण्यात आले आहे. त्यामुळे सिरसाट कुटुंबाला धक्काच लागला. वारंवार देयकात दुरुस्ती करून घेताना सिरसाट कुटूंबाची दमछाक होत असतानाही वीज वितरण मात्र त्याची दखल घेत नसल्याची तक्रार आसराबाई सिरसाट यांनी केली आहे. 

Web Title: Household electricity meter bill of 1.20 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.