घराला आग; साहित्य जळून खाक
By Admin | Updated: April 24, 2017 14:16 IST2017-04-24T14:16:09+5:302017-04-24T14:16:09+5:30
तालुक्यातील काटी येथील शेतकºयाच्या शेतातील घराला आग लागून यामध्ये गोºहा जळून ठार झाला.

घराला आग; साहित्य जळून खाक
नांदुरा : तालुक्यातील काटी येथील शेतकऱ्याच्या शेतातील घराला आग लागून यामध्ये गोऱ्हा जळून ठार झाला. तसेच घरातील साहित्यासह शेतीपयोगी साहित्य खाक झाले. तसेच नुकतेच कापूस विकून आलेले रोख ४० हजार रुपये सुध्दा लागलेल्या आगीत खाक झाले. भीकाजी डाबेराव असे आपदग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी घडली. नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाच्यावतीने तलाठी यांनी केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.