घराला आग; सात लाखांचे नुकसान

By Admin | Updated: December 4, 2015 02:50 IST2015-12-04T02:50:29+5:302015-12-04T02:50:29+5:30

वाशिम येथील घटना.

House fire; Loss of seven lakh | घराला आग; सात लाखांचे नुकसान

घराला आग; सात लाखांचे नुकसान

वाशिम : घराला लागलेल्या आगीत सात लाखाचे नुकसान झाल्याची घटना स्थानिक शिवाजी मार्गावरील भवानी नगरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. घरमालक संजय कोंडाणे हे कुटुंबासह शेगावला दर्शनासाठी गेल्यामुळे सुदैवाने जीवितहाणी टळली. भवानी नगर येथिल संजय कोंडाने मुलाच्या पायाचे प्लास्टर काढण्यासाठी प त्नी व मुलीला सोबत घेऊन अकोला येथे गेले होते. अकोला येथिल काम आटोपल्यानंतर शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले असताना त्यांची आई हिराबाई कोंडाणे या गावातील आपल्या मोठय़ा मुलाकडे मुक्कामी गेल्या होत्या. बुधवारी मध्यरात्रीनंतर व गुरुवारच्या पहाटेच्या सुमारास घराला अचानक आग लागली. आगीच्या धुराचे लोट शेजारी राहणार्‍या प्रदीप अशोक पेंढारकर यांच्या निदर्शनात आल्याने त्यांनी ताबडतोब शेजार्‍यांना उठविले. अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले; मात्र तोपर्यंत कोंडाणे यांच्या घरातील फ्रिज, टीव्ही, पंखे, सर्व सामग्री यासोबतच लॉन्ड्री व्यवसायानिमित्त ग्राहकांच्या आलेल्या मौल्यवान साड्या आगीत जळून खाक झाल्या.

Web Title: House fire; Loss of seven lakh