शॉर्ट सर्किटमुळे घराला आग

By Admin | Updated: January 22, 2017 02:55 IST2017-01-22T02:55:28+5:302017-01-22T02:55:28+5:30

मानोरा तालुक्यातील घटना; दीड लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज.

The house fire due to a short circuit | शॉर्ट सर्किटमुळे घराला आग

शॉर्ट सर्किटमुळे घराला आग

मानोरा, दि. २१- तालुक्यातील गव्हा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला शुक्रवारच्या रात्री आग लागली. यामुळे घरातील साहित्य जळून खाक झाले असून, दीड लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गव्हा येथील जाधव यांच्या घरी जादा वीज पुरवठा झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन घरातील फ्रिजच्या किटने पेट घेतला. त्यामुळे घरातील धान्य, वस्तू, फ्रिज, टीव्ही व अन्य जीवनोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यासंदर्भात महेश रमेश जाधव यांनी शनिवारी तहसीलदारांना निवेदन देऊन नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्याची मागणी केली. अरुण परशराम जाधव यांच्या घरातील साहित्यासह १ लाख ५0 हजार रुपयांचे नुकसान झाले. लागलेल्या आगीमुळे घराच्या भिंतीचेसुद्धा नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Web Title: The house fire due to a short circuit