घराला आग लागून ४0 हजारांचे नुकसान!

By Admin | Updated: November 7, 2016 02:45 IST2016-11-07T02:45:26+5:302016-11-07T02:45:26+5:30

उमरदरी येथील घटना; धान्यासह साहित्य जळाले.

The house is damaged by fire of 40 thousand! | घराला आग लागून ४0 हजारांचे नुकसान!

घराला आग लागून ४0 हजारांचे नुकसान!

जऊळका, दि. ६- रेल्वे उमरदरी येथील एका शेतकर्‍याच्या घराला आग लागून कपडे, धान्य व इतर साहित्य जळून खाक झाले. रविवारी सकाळी ११.३0 च्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुमारे ४0 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. उमरदरी येथील शेतकरी शालीग्राम राठोड व त्यांचे कुटुंब शेतात काम करण्यासाठी गेले होते. यादरम्यान घराला आग लागून घरातील वस्तू, गादी, धान्य व नगदी रोकडसह महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले. ही आग कशामुळे लागली, हे कळू शकले नाही. घटनेचा पंचनामा तलाठी आर.के. डाखोरे यांनी केला. तथापि, दुष्काळी परिस्थिती असून, त्यातच ही घटना घडल्यामुळे राठोड कुटुंबीयाची चिंता वाढली आहे.

Web Title: The house is damaged by fire of 40 thousand!