शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

हातभट्टी अड्ड्यांवर धाड; तीन लाखाचा माल जप्त!

By admin | Updated: April 12, 2017 01:33 IST

वाशिम : जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकत तब्बल तीन लाख रुपयांचा माल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : आरोपींविरूद्ध गुन्हे दाखलवाशिम : जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकत तब्बल तीन लाख रुपयांचा माल जप्त केला. १० एप्रिल रोजी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गुलाब भीमराव ताजणे (वय ५० वर्षे) व शेख जफार शेख गफार (वय ३८ वर्षे, दोन्ही रा. आढळनगर, रिठद) यांच्या राहत्या घरी व रिठद शेतशिवारात अशा दोन ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये सडवा मोहमाच ६०० लिटर, १५ लिटर गावठी दारु व साहित्य असा एकंदरित ३० हजार ५५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम पिंपळगाव इजारा शेतशिवारामध्ये रमेश रामू राठोड (वय ५५ वर्षे, रा.पिंपळगाव इजारा) याच्या शेतातील कोठामध्ये छापा टाकला असता, सडवा मोहामाच ९२५ लिटर (किंमत ६४ हजार ७५०) रुपये आढळून आला. कारंजा पोलीस स्टेशनांतर्गत शहरातील गवळीपुरा येथील कासम कालू निमसुरवाले (वय ५० वर्षे, रा.गवळीपुरा, कारंजा) याच्या आनंदनगर येथील घरामध्ये छापा टाकला असता, २ हजार ९६५ लिटर सडवा मोहामाच व साहित्य असा एकूण २ लाख ८ हजार रुपयाचा माल आढळून आला. चार ठिकाणी झालेल्या कारवाईत एकंदरित ३ लाख ३ हजार ३०० रुपयांचा माल जप्त करून मोक्यावरच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी संबंधित सर्व आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर सोळंके, पोहेकाँ प्रदीप चव्हाण, रवि घरत, इंगोले, नागोराव खडके, नागरे, महेंंद्र जाधव यांनी केली. ढोणी येथेही कारवाईमंगरुळपीर : तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढोणी येथे ठाणेदार विनायक जाधव यांच्या पथकाने धाड टाकून ३४ हजार ५०० रुपयांची अवैध गावठी दारु जप्त केली. याप्रकरणी आरोपी आनंदा मोरे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत ठाणेदार जाधव यांच्यासह अशोक पाटील, शेषराव डाबेराव, राजू महल्ले आदींनी सहभाग नोंदविला.