सन २०१९मध्ये या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. ४ किमी एवढे अंतर असलेल्या या रस्त्यावर एक मोठ्या, तर सहा लहान पुलांचे काम मंजूर आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त पूल निर्मितीचे काम पूर्णत्त्वास आले आहे. बेबळा नदीवरील हिंगणवाडी रामटेक या दोन गावांना जोडणाऱ्या मोठ्या पुलाची कामेसुद्धा पूर्णत्त्वास आली आहेत. परंतु रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. अर्धवट राहिलेल्या कामामुळे नागरिकांना वाहन घेऊन जातांना मोठी कसरत करावी लागत आहे. आतापर्यंत कित्येक अपघात या रस्त्याने झाले आहेत. रुग्णांना तसेच गर्भवती महिलांना रुग्णालयात घेऊन जातांना या रस्त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या अपूर्ण राहिलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्णत्त्वास आणावे, अशी मागणी हिंगणवाडी रामटेक येथील नागरिक करीत आहेत.
सदर रस्त्याच्या कामाला २.३५ कोटी मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात १.७५ कोटी रुपये खर्च करून काम झाले आहे, तर उर्वरित निधीअभावी या रस्त्याचे काम राखडले आहे.
एस. एन. मालाणी
कंत्राटदार
....................