गतिमंद मुलीवर अतिप्रसंग
By Admin | Updated: August 12, 2014 23:28 IST2014-08-12T23:28:48+5:302014-08-12T23:28:48+5:30
१४ वर्षीय गतिमंद मुलीवर २५ वर्षीय युवकाने अतिप्रसंग केल्याची घटना

गतिमंद मुलीवर अतिप्रसंग
मंगरुळपीर : घरात एकटी असल्याचा फायदा घेवून १४ वर्षीय गतिमंद मुलीवर २५ वर्षीय युवकाने अतिप्रसंग केल्याची खळबळजनक घटना ११ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता तालुक्यातील खडी येथे घडली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडी येथील पिडीत मुलीच्या आईने पोलीसात तक्रार दिली की, फिर्यादीची मुलगी घरात एकटी असताना आरोपी गोपाल नथ्थूजी श्रीनाथ वय २५ रा.खडी याने घरात प्रवेश करून मुलीच्या गतिमंदपणाचा फायदा धेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. सदर तक्रारीवरुन पोलीसांनी आरोपीविरूद्ध कलम ३७६ (२), ४५२ भादवि कलम ५,६ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २0१२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख रऊफ व पोलीस उपनिरीक्षक खुळे करीत आहे. अल्पवयीन गतिमंद मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाच्या घटनेचा सर्व स्तरावरुन निषेध व्यक्त होत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाण अद्यापही घटले नाही. हे या घटनेतून दिसून येत असून या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. सदर घटनेने जिल्हाभरात खळबळ उडली असल्याचे दिसून येत आहे.