सूर्य ओकतोय आग; भटकंती करणाऱ्या जनावरांना झाडाच्या सावलीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:53 IST2019-04-06T16:52:07+5:302019-04-06T16:53:29+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंशाच्यावर गेला असताना माणसांसह जनावरांना उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत.

सूर्य ओकतोय आग; भटकंती करणाऱ्या जनावरांना झाडाच्या सावलीचा आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंशाच्यावर गेला असताना माणसांसह जनावरांना उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. चाऱ्यासाठी जंगलात फिरणारे पशू झाडांच्या सावलीत बसून रखरखत्या उन्हापासून स्वत:चा बचाव करीत असल्याचे चित्र शिरपूर-मालेगाव मार्गावरील शिवारात पाहायला मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यात गतवर्षी समाधानकारक पाऊस पडला तरी, वारेमाप उपसा आणि बाष्पीभवनामुळे ७० हून अधिक लघू प्रकल्प कोरडे झाले आहेत. त्यामुळेच जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. पशूपालक शेकडो, शेळ्या, गाई, म्हशी, बैल घेऊन चाºयासाठी रखरखत्या उन्हात मैलांची भटकंती करीत आहेत. घासभर चारा आणि घोटभर पाणीही जनावरांना मिळणे कठीण झाले असतानाच वाढत्या उन्हामुळे जनावरांचा जीव धोक्यात येत आहे. अशात चरता, चरताच उन्हापासून बचाव करण्यासाठी शेळ्या, गाई आणि इतर पशू एखाद्या झाडाखाली बसून स्वत:चा बचाव करताना दिसत आहेत. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने चाºयासाठी भटकणाºया जनावरांचा जीवही धोक्यात आल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.