शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२१ मेपर्यंत उष्णतेची लाट!

By admin | Updated: May 16, 2016 01:20 IST

उन्हापासून काळजी घेण्याचे वाशिम जिल्हाधिका-यांचे आवाहन.

वाशिम : राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली असून, जिल्ह्यातही या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. गत तीन ते चार दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर तापमानात वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रविवारी केले आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ मे २0१६ पयर्ंत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर २२ ते ३१ मे २0१६ या कालावधीत उष्ण लहरी हळूहळू कमी होणार आहेत. उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सकाळी १0 ते सायंकाळी ५ या कालावधीत गरज नसताना उन्हात जाणे टाळावे. अत्यावश्यक असल्यास उन्हात जाताना डोक्याला दुपदरी पांढरा रूमाल बांधावा. अंगात शक्यतो काळे व भडक रंगाचे कपडे घालू नये, सैल पांढरे कपडे घालावे, पायात पादत्राणे घालून चालावे. उन्हामध्ये फिरताना थोड्या-थोड्या वेळाने सावलीमध्ये थांबावे. शेतमजूर व वीटभट्टीवर काम करणारे कामगार यांनी सकाळी व दुपारनंतर उशिरा अंगमेहनतीचे काम करावे, तसेच भरपूर पाणी प्यावे व अत्यावश्यक स्थितीत डोक्याला रूमाल बांधून काम करावे, असे आवाहन द्विवेदी यांनी केले. जनावरांना सावलीमध्ये बांधावे व त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.