आरोग्य उपकेंद्रांतर्गत आरोग्य सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:43 IST2021-04-02T04:43:57+5:302021-04-02T04:43:57+5:30

------ अनसिंग आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण मोहीम वाशिम : वाशिम तालुक्यात ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा रेड झोन म्हणून ...

Health survey under health sub-center | आरोग्य उपकेंद्रांतर्गत आरोग्य सर्वेक्षण

आरोग्य उपकेंद्रांतर्गत आरोग्य सर्वेक्षण

------

अनसिंग आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण मोहीम

वाशिम : वाशिम तालुक्यात ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा रेड झोन म्हणून घोषित केलेल्या अनसिंग येथील प्राथमिक आरोग केंद्रात ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

-----------

सिंचन विहिरींच्या प्रस्तावांत वाढ

वाशिम : रोहयोंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या सिंचन विहिरींच्या प्रस्तावात वाढ होत आहे. पंचायत समित्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारपर्यंत जिल्ह्यात ९१० प्रस्ताव ग्रामपंचायतींनी दाखल केले आहेत.

-----------------

जिल्ह्याबाहेर असलेल्या ९ जणांना कोरोना

वाशिम : विविध कामानिमित्त जिल्ह्याबाहेर गेलेल्या वाशिम जिल्ह्यातील ९ नागरिकांना कोरोना संसर्ग असल्याचे संबंधित जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या गत दोन दिवसांतील अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Health survey under health sub-center