आसरा पार्डी येथे घाणीमुळे आरोग्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:46 IST2021-08-21T04:46:46+5:302021-08-21T04:46:46+5:30
वाशिम तालुक्यातील आसरा पार्डी येथे पावसाचे पाणी, सांडपाणी वाहून जाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यातच नळाचे, धुण्याभांड्याचे ...

आसरा पार्डी येथे घाणीमुळे आरोग्याला धोका
वाशिम तालुक्यातील आसरा पार्डी येथे पावसाचे पाणी, सांडपाणी वाहून जाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यातच नळाचे, धुण्याभांड्याचे पाणी रस्त्यावर साचल्याने डबके तयार झाले आहेत. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका असून, डासांचा वाढला प्रादुर्भाव ग्रामपंचायत प्रशासनाने सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी गावातील नाल्यांची साफसफाई आणि घाण कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे; परंतु आसरा पार्डी येथे गेल्या काही दिवसांपासून नाल्यांची सफाई झाली नाहीच उलट नळाचे पाणी गावातील मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने वाहून जागोजागी डबके साचले आहे. त्यामुळे गावात गांजर गावात खूप वाढले आहे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती ग्राम पंचायत आसरा पार्डी यांच्याकडे देऊन गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी गजानन गिर्ही, रमेश सखाराम वानखेडे, प्रलाद वानखेडे, अनिल मारोती वानखेडे, सोपान गजानन पाटणकर, विठ्ठल महादेव धनगर, प्रलाद लक्ष्मण वानखेडे व ग्रामस्थांनी यांनी केली; परंतु अद्यापही ग्रामपंचायत प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही.
-------------------------------
कोट: पार्डी आसरा येतील नाल्याची साफसफाई वेळोवेळी नसल्याने गावाची दुर्दशा होत आहे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यूची भीती मनात वाढली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- गजानन गिरी, ग्रामस्थ
-------------------------------------------
कोट: आसरा पार्डी येथील नाल्यांची कामे खूप वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या आहेत. या नाल्यांची कामे करताना सांडपाणी वाहून जाण्याकडे लक्ष देण्यात आले नाही. तांत्रिक दोषामुळे आता पावसाचे पाणी, धुण्याभांड्याचे पाणी साचत आहे. तरीही नाल्याची साफसफाई तातडीने करून घेऊ
- परसराम ठाकरे, सरपंच