शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाइन फ्लू’साठी आरोग्य विभाग सतर्क

By admin | Updated: March 15, 2015 01:05 IST

२४ तास कर्मचारी; दहा बेडच्या वार्डची निर्मिती.

वाशिम : नागपूर, अमरावती शहरापाठोपाठ येथील देवपेठ परिसरात वास्तव्यास असलेला एका गरोदर महिलेला स्वाइन फ्लू ची लागण झाल्याने संपूर्ण जिल्हय़ात खळबळ उडाली असून, आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे यांनी २४ तास आरोग्य सेवा देण्यात येईल, अशी उपाय योजना केली आहे. विषम तापमानामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अचानक वाढलेली थंडी, ढगाळी वातावरण, त्यानंतर तापमानात झालेली वाढ हा बदल एच-वन आणि एन-वन या स्वाइन फ्लू विषाणूसाठी पोषक ठरणारा आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातही स्वाइन फ्लूच्या प्रसाराबाबत दक्षता घेतली जात आहे. स्वाइन फ्लू झालेल्या महिलेच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये प्रथमदर्शनी ह्यस्वाइन फ्लूह्ण असल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित वैद्यकीय अधिकार्‍याने संशयीत महिलेच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविले. या तपासणीमध्ये गरोदर महिलेला ह्यस्वाइन फ्लूह्ण असल्याचा पॉझीटीव्हह्ण अहवाल अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयाला १२ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला, याची माहिती जिल्हय़ाभरात पसरून लोकांनी धास्ती घेतली. याबाबत आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती करण्यात येत असून, मार्गदर्शक सूचनाही केल्या जात आहेत. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे यांच्याशी संपर्क साधला असता नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेणे गरजेचे आहे. काळजी घेतल्यास त्यापासून संरक्षण मिळू शकते, अशी माहिती दिली. सर्दी-पडसा, ताप, अंगदुखी, घशात खवखव अशीच लक्षणे स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये आढळतात. त्यामुळे प्रथमदर्शनी हा आजार सहज ओळखता येत नाही. त्याकरिता रुग्णांनी तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहेत.