निजामपूर येथे आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:47+5:302021-06-05T04:28:47+5:30
अतिक्रमणाचे सर्वेक्षण रखडले वाशिम : गायरान जमिनींवर अतिक्रमण झालेले आहे. या संदर्भात सर्वेक्षणाची मागणी केली होती. मात्र, ...

निजामपूर येथे आरोग्य तपासणी
अतिक्रमणाचे सर्वेक्षण रखडले
वाशिम : गायरान जमिनींवर अतिक्रमण झालेले आहे. या संदर्भात सर्वेक्षणाची मागणी केली होती. मात्र, ती रखडली आहे.
रस्ता कामासाठी वृक्षांची कटई
वाशिम : वाशिम शहरातील पोस्ट ऑफिस चौक ते वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय या मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यामुळे रस्ता कामात येणाऱ्या वृक्षांची कटाई केली जात आहे.
वाहनांतून प्रदूषण; कारवाईची मागणी
वाशिम : बहुतांश जीप, ऑटो, दुचाकी वाहने जुनी झाली असून, ही वाहने सर्रास रस्त्यावरून धावत असल्याने प्रदूषण होत आहे. संबंधित यंत्रणेने त्यावर निर्बंध लादून प्रदूषणाची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.
अनसिंग परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : अनसिंग परिसरातील ग्रामीण रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. इतर गावांना जोडणारे रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
पोलीस स्टेशन चौकात दुभाजकाची गरज
वाशिम : संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन चौक परिसरात रस्ता दुभाजक टाकण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. या संदर्भात बांधकाम विभागाला सोमवारी नागरिकांनी निवेदनही दिले.
नारायणबाबा तलाव सौंदर्यीकरण जाेमात
वाशिम : महाराष्ट्र दिनी शहरातील आराध्यस्थान संतश्रेष्ठ नारायणबाबा मंदिराजवळील दारिद्र्यहरण तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामास लाेकप्रतिनिधींनी भेट दिल्यानंतर या कामास जाेमात सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.