मालेगाव शहरात आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:42 AM2021-05-12T04:42:36+5:302021-05-12T04:42:36+5:30

००००००० मोफत प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा वाशिम : पहिल्या लॉटरी पद्धतीत जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झालेली ...

Health check up in Malegaon city | मालेगाव शहरात आरोग्य तपासणी

मालेगाव शहरात आरोग्य तपासणी

Next

०००००००

मोफत प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा

वाशिम : पहिल्या लॉटरी पद्धतीत जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झालेली आहे. मात्र, कोरोनामुळे कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू केव्हा होणार? याकडे पालकांचे लक्ष लागून आहे.

००००००

लक्षणे असल्यास चाचणी करण्याचा सल्ला

वाशिम : जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात असून, सर्दी, ताप किंवा खोकला आदी लक्षणे असल्यास वेळ न दडविता तातडीने कोरोना चाचणी करावी, असा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी ११ मे रोजी दिला.

००००००

नियम न पाळणाऱ्या ४३ जणांवर कारवाई

वाशिम : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या ४३ जणांवर गत दोन दिवसांत मालेगाव पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.

Web Title: Health check up in Malegaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.