देपूळ परिसरात आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST2021-03-04T05:17:51+5:302021-03-04T05:17:51+5:30

---------------- किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन वाशिम: उन्हाळ्यात मका पिकावर प्रामुख्याने रस शोषणाºया किडींचा प्रादूर्भाव आढळून येऊ शकतो त्या अनुषंगाने या ...

Health check up in Depul area | देपूळ परिसरात आरोग्य तपासणी

देपूळ परिसरात आरोग्य तपासणी

----------------

किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन

वाशिम: उन्हाळ्यात मका पिकावर प्रामुख्याने रस शोषणाºया किडींचा प्रादूर्भाव आढळून येऊ शकतो त्या अनुषंगाने या किडीची ओळख व व्यवस्थापनानाबत कृषी विभागाकडून गत आठवडाभरापासून तालुक्यातील शेतकºयांना मार्गदर्शन केले जात आहे.

----------

पशूसंवर्धन विभागातील २१ पदे रिक्त

वाशिम: जिल्हा पशू संर्वधन अधिकारी कार्यालयांतर्गत विविध संवगार्तील २१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध योजनांच्या अमलबजावणीवर परिणाम होत असून, कार्यरत कर्मचाºयांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.

-----------

संपर्कातील व्यक्तींच्या माहितीसाठी आवाहन

वाशिम: अनसिंग परिसरात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नियंत्रणासाठी बाधितांच्या संपकार्तील व्यक्तींची तातडीने कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करून स्वत:च बाधिताच्या संपकार्तील व्यक्तींची माहिती मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

------------

तामसी येथे कोरोना चाचणी

वाशिम: तालुक्यातील तामसी येथे दरदिवशी कोरोना विषाणू संसगार्चे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात मंगळवारी आणखी एक रुग्ण आढळून आल्यामुळे बाधितांच्या संपकार्तील व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांची कोरोना चाचणी आरोग्य विभागाने सुरू केली.

-------------

१२ ग्रामपंचायतींकडून कोरोना जनजागृती

वाशिम: गावागावात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेत आवश्यक उपाय योजना करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी पुढाकार घेतला असून, तालुक्यातील १२ गावांत मंगळवारी कोरोना जनजागृती करण्यात आली.

Web Title: Health check up in Depul area