आरोग्य केंद्राच्या जागेचा गुंता कायमच!
By Admin | Updated: June 25, 2014 01:40 IST2014-06-25T01:21:29+5:302014-06-25T01:40:05+5:30
वारला प्राथिमिक आरोग्यकेंद्रचा कारभार चालतो ग्रामपंचायतच्या दोन खोल्यातून

आरोग्य केंद्राच्या जागेचा गुंता कायमच!
वारला : साडेपाच वर्षापूर्वी अनसिंगला ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आणि अनसिंगचे प्राथमिक आरोग्य केंद्र वारला येथे स्थलांतरति करण्यात आले. मात्र, स्वतंत्र जागाच उपलब्ध नसल्याने आजच्या स्थितीत ग्राम पंचायतच्या सुविधा नसलेल्या दोन खोलीत प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरु आहे. रुग्णांच्या व्यथा जाणणार्या या आरोग्य केंद्राच्या ह्यव्यथाह्ण जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला वेळ नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
वारला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनसिंग १, अनसिंग २, वारला, उकळीपेन, सावळी, बाभुळगाव, उमरा (शम.), पिंपळगाव असे आठ उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रामध्ये ३९ गाव अंतभरूत असून या एकूण गावातील लोकसंख्या ६७,७२४ आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेचा प्रश्न अजूनही निकाली निघाला नसल्याने रुग्णांना योग्य उपचारांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांमधून रोष व्यक्त होत आहे.
चार वर्षापुर्वी सदर केंद्र ग्रामपंचायतच्या दोन खोल्यांमध्ये सुरु करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या दोन खोल्यांमध्येच आरोग्य केंद्राचा कारभार सुरु असल्यामुळे रुग्णांवर सुविधांअभावी योग्य उपचार मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.