मुख्याध्यापकांना प्रशासकीय कामकाजाचे प्रशिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 16:01 IST2018-09-24T15:59:17+5:302018-09-24T16:01:52+5:30

सोमवार, २४ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Headmaster's administrative work training! | मुख्याध्यापकांना प्रशासकीय कामकाजाचे प्रशिक्षण!

मुख्याध्यापकांना प्रशासकीय कामकाजाचे प्रशिक्षण!

ठळक मुद्दे स्थानिक श्री शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित या प्रशिक्षण कार्यशाळेला मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.१०० शाळांच्या मुख्याध्यापकांनी कार्यशाळेस हजर राहून कामाचे बदललेले स्वरूप जाणून घेतले.

कार्यशाळेस प्रारंभ : जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यशदा, पुणे तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने सोमवार, २४ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक श्री शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित या प्रशिक्षण कार्यशाळेला पहिल्याच दिवशी तीन तालुक्यांमधील सुमारे १०० शाळांच्या मुख्याध्यापकांनी कार्यशाळेस हजर राहून कामाचे बदललेले स्वरूप जाणून घेतले.
या कार्यशाळेचे उद्घाटन अरूण अरूण सरनाईक यांनी केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी आहाळे, ‘डाएट’चे नागरे, प्राचार्य प्रतिभा तायडे, अ‍ॅड. अरूण ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापकांना व्यवसाय कर, आयकर, नवीन पेंशन योजना, साहित्य खरेदीसाठी राबविण्यात येणारी ई-टेंडरिंग प्रक्रिया आदिंसंदर्भात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा २५ सप्टेंबरपर्यंत चालणार असून मंगळवारी याअंतर्गत शाळांच्या लिपिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Web Title: Headmaster's administrative work training!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम