शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक गोळा करणे मुख्याध्यापकांना झाले अशक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 1:52 PM

वाशिम : शासनाकडून विविध स्वरूपातील ८ ते ९ प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. त्यात यशस्वी होणाºया विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक अनिवार्य असून ते ग्रामपातळीवर गोळा करणे मुख्याध्यापकांना बहुतांशी अशक्य होत आहे. 

ठळक मुद्देशाळांमधील कामकाज जेव्हापासून आॅनलाईन झाले, तेव्हापासून मुख्याध्यापकांच्या डोक्यावरील अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे.. ८ ते ९ प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यांशी लिंक करावे लागतात.विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक आवश्यक असून ते गावातून गोळा करण्यासाठी मुख्याध्यापकांना मोठे परिश्रम घ्यावे लागत आहेत.

वाशिम : शासनाकडून विविध स्वरूपातील ८ ते ९ प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. त्यात यशस्वी होणाºया विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक अनिवार्य असून ते ग्रामपातळीवर गोळा करणे मुख्याध्यापकांना बहुतांशी अशक्य होत आहे. शाळांमधील कामकाज जेव्हापासून आॅनलाईन झाले, तेव्हापासून मुख्याध्यापकांच्या डोक्यावरील अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. शिक्षकांच्या पगारातून होणारी कपात त्या-त्या खात्यांमध्ये जमा करणे, पगारपत्रक तयार करून ते आॅनलाईन अपलोड करणे, ही सर्व कामे मुख्याध्यापकांनाच पाहावी लागत असून त्यातच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे ‘रेकॉर्ड’ही ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांकडेच सोपविण्यात आली आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक आवश्यक असून ते गावातून गोळा करण्यासाठी मुख्याध्यापकांना मोठे परिश्रम घ्यावे लागत असल्याने मुख्याध्यापक यामुळे हैराण झाले आहेत.मुख्याध्यापकांचे मुख्य काम ज्ञानार्जन करणे हे होय. मात्र, शाळांमध्ये ‘आॅनलाईन’ प्रणाली अंमलात आली तेव्हापासून मुख्याध्यापकांच्या खांद्यावरच अधिकची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. ८ ते ९ प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यांशी लिंक करावे लागतात. ते गावातून गोळा करित असताना पालकांशी संपर्क होत नाहीत, त्यांचे फोन लागत नाहीत. यामुळे मोठी दमछाक होते.  - उद्धव कष्टे, मुख्याध्यापक.

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्ड