काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST2021-09-26T04:44:45+5:302021-09-26T04:44:45+5:30

वाशिम : काँग्रेस पक्ष ही एक धर्मनिरपेक्ष चळवळ असून, विचारधारा आहे. काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ...

He will take Bhim Shakti activists with him in the mainstream of Congress | काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेणार

काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेणार

वाशिम : काँग्रेस पक्ष ही एक धर्मनिरपेक्ष चळवळ असून, विचारधारा आहे. काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जोमाने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भोजराज यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथे भीमशक्तीच्या तीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व भीमशक्तीचे प्रमुख चंद्रकांत हंडोरे यांचे खंदे समर्थक भीमशक्ती पश्चिम विदर्भातील नेतृत्व दिलीप भोजराज यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत यांच्या अध्यक्षतेत व भीमशक्ती राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने, मधुसुदन भटकर, प्रा. सू. ना. खंडारे, विधी सल्लागार डॉ. एड. मोहनराव गवई, भीमशक्ती प. विदर्भ चिटणीस विजय साबरदंडे, प्रा.भानुदास खंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतम अडागळे, रवी अंभोरे, सुभाष रोकडे, प्रकाश कांबळे, संतोष इंगळे, आदर्श दामोदर, अक्षय घुगे, संदीप बनसोड, उल्हास वाघमोडे आदी कार्यकर्त्यांनी शाल व पुष्प गुच्छ देऊन दिलीप भोजराज यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचलन संतोष इंगळे यांनी केले, तर आभार सुभाष रोकडे यांनी मानले.

Web Title: He will take Bhim Shakti activists with him in the mainstream of Congress