हर्र ऽऽऽ बोला महादेव ..
By Admin | Updated: August 25, 2014 01:55 IST2014-08-25T01:44:22+5:302014-08-25T01:55:55+5:30
शेवटच्या श्रावण सोमवारी वाशिम जिल्हय़ात कार्यक्रमांची रेलचेल.

हर्र ऽऽऽ बोला महादेव ..
वाशिम : श्रावणातील शेवटच्या सोमवारला विशेष महत्त्व. या दिवशी भाविकभक्त शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतात तसेच जल घेऊन येणारे कावडमंडळ जिल्हय़ात दाखल होतात. उद्याच्या, २५ ऑगस्ट रोजीच्या शेवटच्या श्रावण सोमवारी, भाविकांसाठी शिवमंदिरे सज्ज झाली आहेत. हजारो शिवभक्त या दिवशी शिवमंदिरात नतमस्तक होतात.
जिल्हय़ात शेवटच्या श्रावण सोमवारी विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिम शहरासह जिल्हय़ात प्रसिद्धीस पावलेली अनेक शिवमंदिरे आहेत. समुद्रसपाटीपासून १,८४0 फूट उंचावर असलेल्या व परिसरात पाच नद्यांचा उगम असलेल्या तसेच जोतिष्य तज्ज्ञांनी जी पृथ्वीची मध्यरेषा कल्पिली आहे, त्या वत्सगुल्म नगरीत काशीनंतर सर्वात जास्त महादेवाची मंदिरे आहेत. ङ्म्रावण मासात महिनाभर मंदिरांमध्ये गर्दी तर दिसून येतेच, शिवाय दर ङ्म्रावणातील सोमवारी शहराला यात्रेचे स्वरूप येते. वत्सगुल्म नगरीत करुणेश्वर, मध्यमेश्वर, चंदेश्वर, पदमेश्वर, पाळेश्वर, खंडेश्वर, मल्लिर्काजुन, नंदिकेश्वर, अमृतेश्वर, गुप्तेश्वर, कालेश्वर, नीळकंठेश्वर, पांडुरंगेश्वर, राज राजेश्वर, सिद्धेश्वर जागमाथा, जंगलेश्वर, हुडी महादेव, मंगलेश्वर, नागनाथ, त्र्यंबकेश्वर, भुवनेश्वर बारा ज्योतिर्लिंंंग, गंगेश्वर, अध्रेश्वर यासह बरेच छोटी-मोठी मंदिरे आहेत. जिल्हय़ातही अनेक शिवमंदिरे आहेत. अशी आख्यायिका आहे की, ङ्म्रीराम व सीतेला वनवास झाल्यानंतर त्यांनी अमानीपासून जवळच असलेल्या तपोवन येथे मुक्काम केला होता. ङ्म्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व निसर्गरम्य घनदाट जंगलामध्ये असलेल्या तपोवन येथील शिवालयात विदर्भासह मराठवाड्यातील भाविकांचा मोठा मेळा ङ्म्रावण मासानिमित्त भरत असतो.