पुन्हा गारपीट, अवकाळी पाऊस
By Admin | Updated: March 2, 2016 02:43 IST2016-03-02T02:43:38+5:302016-03-02T02:43:38+5:30
वाशिम जिल्ह्यात मंगळवारी सांयकाळी अवकाळी पावसाची हजेरी लावली.

पुन्हा गारपीट, अवकाळी पाऊस
वाशिम: जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळनंतर सर्वदूर वादळ वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकर्यांचे नुकसान केले. मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री खुर्द व अन्य काही भागात गारपीट झाल्याने एकच धावपळ उडाली. गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीने जणू मुक्कामच ठोकला आहे. यामुळे भाजीपाला, फळपिकांचे नुकसान होत आहे. मंगरुळपीर: तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वार्यासह अवकाळी पाऊस असल्याने हरभरा, गहू या पिकांचे नुकसान होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह कोसळत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाची झोप उडवली असून, २९ फेब्रुवारी रोजी रात्री तालुक्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस कोसळला. १ मार्च रोजी दुपारपासून मंगरुळपीर शहरात जवळपास दोन तास पाऊस पडला. सोबतच तुरळक गारपीट झाली. पिंप्री खुर्द भागात गारपीट झाल्याची माहिती आहे. गारपिटीच्या वातावरणामुळे फळबागधारक शेतकरी चिंतेत सापडले असून, गेल्या तीन वर्षांंंपासून निसर्गाचा मारा झेलणार्या बळीराजाची चिंता कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत सापडलेल्या बळीराजाला आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे.