शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

व्यायामशाळा तपासणीचे अहवाल पालकमंत्र्यांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:42 PM

वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदानाचा लाभ घेतलेल्या व्यायामशाळांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सविस्तर अहवाल पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, क्रीडा विभागाकडे सादर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदानाचा लाभ घेतलेल्या व्यायामशाळांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सविस्तर अहवाल पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, क्रीडा विभागाकडे सादर केला. या अहवालानुसार काय कारवाई होते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.ग्रामीण तसेच शहरी भागात क्रीडा संस्कृती रुजविणे तसेच व्यायाम करण्यासाठी युवकांसह सर्वांनाच व्यायामशाळांची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून व्यायामशाळा बांधकाम, साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले जाते. प्राप्त प्रस्तावांमधून पात्र ठरलेल्या संस्थांना अनुदान दिल्यानंतर संबंधित संस्थेने व्यायामशाळा सुस्थितीत ठेवणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यातील काही संस्थांनी व्यायामशाळा बांधकामाचे अनुदान घेतल्यानंतर नियमानुसार बांधकाम केले नाही तर काही संस्थांनी व्यायामशाळेचा मूळ उद्देश बाजूला सारत व्यायामशाळांचा वापर अन्य कारणांसाठी केला जात असल्याच्या तक्रारी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत पालकमंत्र्यांनी अनुदान वाटप करण्यात आलेल्या व्यायामशाळांची तपासणी करून त्यांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश क्रीडा विभागाला आॅगस्ट महिन्यात दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा विभागाने व्यायामशाळांची  तपासणी केली असून, पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, क्रीडा विभागाच्या वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार वरिष्ठ स्तरावरून नेमकी कोणती कारवाई होते, याकडे क्रीडाप्रेमींसह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमSanjay Rathodसंजय राठोड