१२ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त

By Admin | Updated: June 30, 2017 01:18 IST2017-06-30T01:18:10+5:302017-06-30T01:18:10+5:30

मालेगाव : मालेगाव पोलीस व अमानी महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त पथकाने राज्य महामार्गावर २९ जून रोजी १२ लाख किमतीचा गुटखा पकडला.

Gutkha worth 12 lakh rupees seized | १२ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त

१२ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मालेगाव पोलीस व अमानी महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त पथकाने वाशिम राज्य महामार्गावर झोडगा गावाजवळ २९ जून रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास १२ लाख किमतीचा गुटखा घेऊन जाणाऱ्या मिनि डोअर या वाहनाला पकडले. गुटखा जप्त करण्यात आला.
मालेगावचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश धोत्रे यांनी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अमानी महामार्ग पोलिसांना सोबत घेऊन वाशिमकडून येणारा एमएच १४ डीएम ८०४७ क्रमांकाचा मिनीडोअर अडविला. तपासणी केली असता त्यामध्ये ‘काबिल’ नावाचा गुटखा मिळाला असून, त्याची किंमत १२ लाख रुपये आहे, तर जप्त मिनीडोअरची किंमत ८ लाख रुपये आहे.

Web Title: Gutkha worth 12 lakh rupees seized