बंदीतही गुटख्याची चांदी

By Admin | Updated: July 19, 2014 01:06 IST2014-07-19T00:45:48+5:302014-07-19T01:06:45+5:30

वाशिम शहरात गुटखाबंदीचा बोजवारा : खुलेआम विकल्या जातोय गुटखा.

Gutkha silver | बंदीतही गुटख्याची चांदी

बंदीतही गुटख्याची चांदी

वाशिम : राज्याच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाने लागु केलेल्या गुटखाबंदीच्या पदराआड शहरात लाखोंच्या गुटख्याचा काळाबाजार फोफावला आहे. काही वितरकांनी गुटख्यासह पान मसाल्याची मोठय़ा प्रमाणात साठेबाजी केलेली असुन आजमितीला चढय़ाभावात त्याची विक्री सुरू आहे. लोकमतने १८ जुलैला राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने सद्यस्थितीत वाशिमसह अकोला जिल्ह्यातील २४00 व्यापार्‍यांना व्यवसायाचे परवाने दिले आहेत. तर ३000 लघु व्यावसायिंकाची नोंदणी या विभागाकडे आहे. यापैकी बहुतांश व्यापार्‍यांचा गुटखा व पान मसाला विक्रीचा व्यवसाय आहे. गुटख्यावर बंदी येण्यापूर्वी प्रत्येक दुकानदाराकडुन दिवसाकाठी गुटख्याचे पाच ते सहा पुडे विकले जात होते. गुट ख्याच्या एका पुड्यात साधारणपणे ५५ पाकीटे येतात. त्यामुळे गुटख्याच्या या विक्रीतून दिवसाकाठी लाखोंची उलाढाल होते. यामध्ये सुमारे २0 टक्के विक्रे त्यांला नफा मिळतो. शासनाने सन २0१२ मध्ये गुटखा व पानमसाला विक्रीवरच बंदी आणली आहे. परिणामी, या व्यवसायातील लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. नेमका याच बंदीचा फायदा घेऊन शहरातून काही विक्रेत्यांनी परप्रांतातून गुटखा व पान मसाला आणून त्याची साठेबाजी केली आहे. विशेष म्हणजे गुटखा पुडीच्या तिप्पट किमतीने आजमितीला विक्री सुरू आहे. लोकमतने १८ जुलैला राबविलेल्या स्टिंग ऑपरेशमधून ही बाब समोर आली आहे.
लोकमतने लाखाळा परिसर, हिंगोली नाका, अकोला नाका, पुसद नाका व हिंगोली नाका चौकात स्टिंग केले. यातून समोर आलेले निष्कर्ष धक्कादायकच आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग अथवा पोलीस विभाग यापैकी कुणाचीच गुटखा विकणार्‍यांना भिती उरली नसल्याचे दिसून येत आहे. यातूनच दिवसागणिक हा काळाबाजार फोफावतच चालला आहे.

Web Title: Gutkha silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.