या अंतर्गत मंगरूळपीर तालुक्यातील मौजे पेडगाव येथील कृषी सहाय्यक सुमेध खंडारे यांनी अष्ट सूची म्हणजे काय? व ती कशी उपयोगात आणता येईल याबाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये बियाण्याची उगवणशक्ती तपासणे, घरगुती पद्धतीने बियाणेचा वापर करणे. बाजारातील किंवा घरचे बियाणे यांची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणे, सोयाबीन वानाची योग्य निवड, पेरणी व पेरणीची खोली, बियाण्याचे योग्य प्रमाण, रासायनिक खताचा योग्य प्रमाणात वापर व योग्य तणनाशकाची निवड व योग्य मात्रा या आठ बाबीचा उपयोग योग्य वेळी केल्यास निश्चित उत्पन्न वाढण्यास मदत होईल. सोयाबीन पेरणीपासून ते एक काढणीपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काय? काळजी घ्यावी, कृषी विभागाच्या विविध योजना, महाडीबीटी याबाबत कृषी पर्यवेक्षक मिलिंद कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
सोयाबीन पिकाच्या उत्पादकतावाढीसाठी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST