वृक्षलागवडीबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:40 IST2021-02-13T04:40:02+5:302021-02-13T04:40:02+5:30
-- पोलिसांकडून वाहनांची तपासणी वाशिम: रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत नियमांचे ...

वृक्षलागवडीबाबत मार्गदर्शन
--
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
वाशिम: रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली. गेल्या चार दिवसांत १९५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
-----
पोलीस पाटलांचे मानधन थकित
आसेगाव: ग्रामीण भागात कोरोना संसर्ग नियंत्रणात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या पोलीस पाटलांना आर्थिक अडचणींचा सामना सामना करावा लागत आहे. जिल्हाभरातील २०० पेक्षा अधिक गावांतील पोलीस पाटलांचे मानधन सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे.
----
जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय
वाशिम : मानोरा शहराला मजीप्राच्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या जलवाहिनीला कार्ली गावादरम्यान गळती लागल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
----
रोहित्र दुरुस्तीची मागणी
वाशिम : जिल्हाभरातील ५४ रोहित्र गेल्या आठवडाभरापासून नादुरुस्त आहेत. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनात अडथळे येत आहेत. हे रोहित्र बदलण्याची किंवा तातडीने दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी बुधवारी केली.
---
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
उंबर्डा बाजार: सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून कारंजा तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी गुरुवारी आणि शुक्रवारी करण्यात आली