महिलांच्या शेतीशाळेत सोयाबीनवरील किडींबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:27 IST2021-07-21T04:27:03+5:302021-07-21T04:27:03+5:30
पंचाळा येथे शेतीशाळेत मार्गदर्शन करताना लव्हाळे यांनी शेतकऱ्यांनी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी केल्यास, कृषी विद्यापीठाच्या शिफारसीने कीटकनाशकांचा वापर ...

महिलांच्या शेतीशाळेत सोयाबीनवरील किडींबाबत मार्गदर्शन
पंचाळा येथे शेतीशाळेत मार्गदर्शन करताना लव्हाळे यांनी शेतकऱ्यांनी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी केल्यास, कृषी विद्यापीठाच्या शिफारसीने कीटकनाशकांचा वापर केल्यास खर्चात बचत होऊ शकते, असे सांगतानाच तसेच शेतकऱ्यांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन केले. तसेच फवारणीच्या पाण्यात लिंबूचा वापर करून त्याचा सामू योग्य करावा. जेणेकरून फवारणीसाठी वापरलेले घटक पाण्यात व्यवस्थित मिसळले जातील व फवारणी योग्य होईल, असा सल्लाही दिला. या शेतीशाळेस दुर्गा मोरे, शारदा मोरे, सरस्वती मोरे, जयमाला कच्छवे, निर्मला मोरे, सुमित्रा मोरे, शारदा चव्हाण, सारिका विभुते, छाया मोरे, नंदा मोरे, सरस्वती मोरे, मनीषा मोरे, सुशिला मोरे, सुवर्णमाला मोरे आदी महिला उपस्थित होत्या. कृषी सहाय्यक बाळू इंगळे यांनी शेतीशाळेच्या नियोजनात मोलाचे सहकार्य केले.