आरोग्यवर्धिनी केंद्रात मातांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:52+5:302021-02-05T09:22:52+5:30
उंबर्डा बाजार येथील आरोग्यवर्धिनी केंद्राकडून मार्गदर्शन कार्यक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. नांदे ...

आरोग्यवर्धिनी केंद्रात मातांना मार्गदर्शन
उंबर्डा बाजार येथील आरोग्यवर्धिनी केंद्राकडून मार्गदर्शन कार्यक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. नांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या आठवडाभरापासून गरोदर आणि स्तनदा मातांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
-------------
जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
उंबर्डा बाजार: शासनाच्या निर्देशानुसार येथील जिल्हा परिषद विद्यालयात पाचवी ते आठवीचे वर्ग भरविण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असल्याने प्राचार्यांच्या सुचनेनुसार २८ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गापासून बचावाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करून नाका, तोंडावर नियमित मास्क लावणेही बंधनकारक करण्यात आले.
--------------------
आमदारांकडून लसीकरण मोहिमेची पाहणी
उंबर्डा बाजार: आरोग्य विभागाकडून कोविड-१९ संसर्ग नियंत्रणासाठी कारंजा तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. कारंजा-मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी हे या मोहिमेचा आढावा घेत असून, त्यांनी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील आरोग्यवर्धिनी केंद्रात राबविल्या जात असलेल्या लसीकरण मोहिमेचीही पाहणी गुरुवारी केली.