फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST2021-07-31T04:40:53+5:302021-07-31T04:40:53+5:30
एकाच दिवशी तीन सापांना जीवदान वाशिम : निसर्ग स्पर्श फाऊंडेशन प्रणित वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सर्पमित्र सदस्यांनी नाग आणि ...

फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
एकाच दिवशी तीन सापांना जीवदान
वाशिम : निसर्ग स्पर्श फाऊंडेशन प्रणित वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सर्पमित्र सदस्यांनी नाग आणि मण्यार या दोन विषारी सापांसह धामण जातीच्या बिनविषारी सापाला सुरक्षित पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. विठोबा आडे, शुभम सावळे, शिवा भेंडे, श्रीकांत डापसे यांनी हे साप पकडले.
आशासेविकांचे मानधन वाढविण्याची मागणी
वाशिम : कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून शासन, प्रशासनाने सोपविलेली जबाबदारी खंबीरपणे पार पाडणाऱ्या आशा सेविका, गटप्रवर्तक व बीसीएम यांच्या मानधनात समाधानकारक वाढ करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी आयटक संघटनेकडून होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर, किन्हीराजा, मेडशी आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची काही पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.