वाशिम येथे सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 15:05 IST2018-05-17T15:05:31+5:302018-05-17T15:05:31+5:30

वाशिम  : वाढत्या तंत्रज्ञानासह वाढता सोशीयल  मिडीयाचा लक्षात घेता या माध्यमातुन अनेक फसवणुकीचा घटनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

Guidance Camp for Cyber ​​Security at Washim | वाशिम येथे सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन शिबीर

वाशिम येथे सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन शिबीर

ठळक मुद्दे १३ मे रोजी  अकोला नाका वाशिम येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. टसअप व फेसबुकव्दारे मैत्री करुन फसवणुक या विषयावर सायबर कायदे अभ्यासक नागसेन सुरवाडे मार्गदर्शन करण्यात आले.

वाशिम  : वाढत्या तंत्रज्ञानासह वाढता सोशीयल  मिडीयाचा लक्षात घेता या माध्यमातुन अनेक फसवणुकीचा घटनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये विशेषता  महिला वर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडत असल्याचे मागील काही घटनावरुन  दिसुन येते. याला आळा बसावा व महिलांची सोशीयल मिडीयाच्या माध्यमातुन  फसवणुक होवु नयेयाकरिता जिल्ह्यातील लोकप्रिय राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक व बहू.संस्था वाशिम व ज्ञानरेखा बहू. सेवाभावी संस्था सुकळी यांच्यावतीने १३ मे रोजी  अकोला नाका वाशिम येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

सोशीयल मिडीयाचा वापर करतांना सुरशितेसाठी घ्यावयाची काळजी, सायबर सुरक्षा आणि कायदे, सोशीयल नेटवर्कींग साईडचा  गैरवापर, डिजीटल चोरीपासुन सावध राहण्याचे उपाय, नोकरी लावण्याया कारणास्तव सोशीयल मिडीयातुन  फसवणुक,  व्हाटसअप व फेसबुकव्दारे मैत्री करुन फसवणुक या विषयावर सायबर कायदे अभ्यासक नागसेन सुरवाडे मार्गदर्शन करण्यात आले.  महिलांच्या फसवणुकीला आळा घालण्याकरिता महिलांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे या विषयावर मार्गदर्शन  राजरत्न व ज्ञानरेखा संस्थेचे विनोद पट्टेबहादूर, विकास पट्टेबहादूर, जिल्हा युव पुरस्कारप्रार्थी भगवान ढोले, महादेव क्षीरसागर, अरविंद उचित, सुमेध तायडे, संतोष हिवराळे, सोनल तायडे, सविता पट्टेबहादूर, नंदीनी हिवराळे, स्रेहल तायडे, हंसीनी उचित, सुनिता गवई, सिमा इंगोले, भरत वैद्य, देविदास धामणकर, कलीम मिर्झा,  संतोष राठी, विशल सावंत, सुभाष रोकडे , राम पाटील, संतोष सरकटे आदिंनी केले.

Web Title: Guidance Camp for Cyber ​​Security at Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.