पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:24+5:302021-09-27T04:45:24+5:30
०००००००००००००० जि. प. शाळांच्या वर्गखोल्या नादुरुस्तच वाशिम : कोरोना संसर्गामुळे यंदाही शाळा भरणार नाहीत. त्यामुळे यंदाच्या सत्रापूर्वी वर्गखोल्यांची दुरुस्ती ...

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन
००००००००००००००
जि. प. शाळांच्या वर्गखोल्या नादुरुस्तच
वाशिम : कोरोना संसर्गामुळे यंदाही शाळा भरणार नाहीत. त्यामुळे यंदाच्या सत्रापूर्वी वर्गखोल्यांची दुरुस्ती तातडीने करून विद्यार्थ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. तथापि, अनेक शाळांच्या वर्गखोल्यांसाठी निधी मिळूनही दुरुस्तीचे काम झाले नाही.
००००००००००
आपले सरकार केंद्रातील संगणक नादुरस्त
वाशिम : तालुक्यातील ग्रामपंचायतमधील कॉम्प्युटर, प्रिंटर नादुरुस्त असल्याने आपले सरकार सेवा केंद्रचालकांना अडचणी येत आहेत. हे संच २०११ पासून बदललेच नाहीत. त्यामुळे बिघाडानंतर दुरुस्ती कली तरी आठवडाभरात त्यात पुन्हा पुन्हा बिघाड होत असल्याने ग्रामस्थांना कागदपत्रे वेळेत मिळण्यात अडचणी येत आहेत. याची दखल घेण्याची मागणी आपले सरकार केंद्रचालकांनी केली आहे.
०००००००००००००
आरोग्य केंद्राकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. या पृष्ठभूमीवर वाशिम तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने शनिवारी ग्रामस्थांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात ग्रामपंचायतीही सहभागी होत आहेत.
------
ग्रामजीवनोन्नतीअंतर्गत परसबागांची उद्दिष्ट पूर्ती
वाशिम : जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी ४५०० पोषण परसबागांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. या उद्दिष्टाची पूर्तता प्रशासनाकडून करण्यात आली असून, आता या पोषण परसबागांचा ग्रामीण महिलांना मोठा आधार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रकल्प व्यवस्थापक सुधीर खुजे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.