येवता येथे आजी माजी सैनिकांचा सत्कार समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:30+5:302021-09-14T04:48:30+5:30
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून प्रतापराव सरनाईक, गणेश भांदुर्गे,आकाश वाघ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ...

येवता येथे आजी माजी सैनिकांचा सत्कार समारंभ
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून प्रतापराव सरनाईक, गणेश भांदुर्गे,आकाश वाघ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी सीआरपीएफमधून निवृत्त झालेले हिवरापेन येथील जवान प्रतापराव सरनाईक यांनी गेली २९ वर्षे देशाची अविरत सेवा केली. त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच येवता गावचे सुपुत्र आर्मी मधील कार्यरत असलेले आकाश लक्ष्मण वाघ, गोवर्धन येथील सैनिक दीपक भास्करराव वाघ, येवता येथील सैनिक श्रीमती संजीवनी मदन रोही यांचे दोन्ही सुपुत्र प्रशांत मदन रोही आणि विजय मदन रोही यांचा मातेसह, गणेश दत्तराव जारे, विशाल ज्ञानबा काळे, गणेश नामदेवराव भांदुर्गे , आर्मीमधून निवृत्त झालेले प्रकाशराव साहेबराव सरनाईक तसेच नागेश विष्णू हिरे यांचा शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग पाटील , सरपंच दिनकर चोपडे ,भागवत लोखंडे, गजानन श्रीराम देशमुख ,भिकाजी काकडे ,भारत चोपडे ,विष्णू भांदुर्गे, श्रीराम देशमुख, दत्ता लोखंडे, पुष्पाबाई अशोकराव देशमुख, भागवत दिवटे, कैलास ईढोळे, स्वाभिमानीचे विदर्भ संघटक गजानन देशमुख,माजी सरपंच राजू भाऊ भांदुर्गे ,माजी सरपंच विष्णू चोपड़े, गणेश अंभोरे आदींची उपस्थिती हाेती.
130921\img_20210913_122346.jpg
येवता येथे आजी माजी सैनिकांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न