शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचा वाशिम येथे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 3:46 PM

ग्रामसेवक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हास्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १३ आॅगस्ट रोजी ग्रामसेवक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढला. त्यानंतर राज्यस्तरीय आंदोलनात सहभागी होत जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे दिले. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करणे, वेतन त्रूटी दूर करणे, जूनी पेन्शन योजना लागू करणे, अतिरिक्त कामे कमी करणे यासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने विविध टप्प्यात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. पहिल्या टप्प्यात ९ आॅगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे देत असहकार आंदोलन केले. दुसºया टप्प्यात १३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर राज्यव्यापी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात सहभागी होत जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले. तत्पूर्वी जिल्हास्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चा काढण्यात आला. ग्रामसेवकांची पदोन्नती प्रक्रिया निकाली काढावी, कंत्राटी ग्रामसेवकांची सुरक्षा ठेव परत करावी, परिभाषित अंशदायी निवृत्त वेतन योजनेंतर्गत (डीसीपीएस) कपातीच्या पावत्या ग्रामसेवकांना द्याव्या, ग्रामसेवक संवर्गाच्या वैद्यकीय देयकांची परिपूर्तता करावी, निलंबित केलेल्या ग्रामसेवकांना ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यामुळे त्यांना त्वरीत सेवेत घेण्यात यावे यासह अन्य प्रलंबित मागण्या तातडीने निकाली काढाव्या अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन