उल्लेखनीय कामगिरी करणाºया ग्रामपंचायतींचा ‘सन्मान’!
By Admin | Updated: May 1, 2017 13:49 IST2017-05-01T13:49:50+5:302017-05-01T13:49:50+5:30
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा सन्मान पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला.

उल्लेखनीय कामगिरी करणाºया ग्रामपंचायतींचा ‘सन्मान’!
वाशिम : हगणदरीमुक्त गाव योजना, स्मार्ट ग्राम योजनेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा सन्मान पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिनिमित्त आयोजित मुख्य प्रशासकीय कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या ह्यशांतीदूतह्ण या माहितीपुस्तिकेचे विमोचनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. स्मार्ट ग्राम योजनेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हिवरा रोहिला (ता. वाशिम), देगाव (ता. रिसोड), दुधाळा (ता. मालेगाव), अजनी (ता. मानोरा), पारवा (ता. मंगरूळपीर), धोत्रा जहांगीर (ता. कारंजा) यांना राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त अंचळ (ता. रिसोड), द्वितीय क्रमांक प्राप्त धोत्रा जहांगीर (ता. कारंजा), तृतीय क्रमांक प्राप्त दुधाळा (ता. मालेगाव) व विशेष पुरकर प्राप्त सायखेडा (ता. मंगरूळपीर), खरोळा (ता. वाशिम) व काजळेश्वर (ता. कारंजा) ग्रामपंचायतींचा सन्मानही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.