मोहरी प्रकल्पातील सिंचन उपसा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतचा पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 03:46 PM2017-11-09T15:46:41+5:302017-11-09T15:54:07+5:30

सिंचनासाठी होत असलेला उपसा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतने लघू सिंचन विभागाकडे निवेदन सादर करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतच्यावतीने जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर केले.

Gram Panchayat take initative to stop irrigation practices in Mohari | मोहरी प्रकल्पातील सिंचन उपसा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतचा पाठपुरावा

मोहरी प्रकल्पातील सिंचन उपसा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतचा पाठपुरावा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी  घेतली दखल  लघू सिंचन विभागाला आदेश

मोहरी: मोहरी येथील प्रकल्पात २० टक्क्यांहून कमी साठा असतानाही या प्रकल्पातून शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होत असून, यामुळे प्रकल्पातील गावाला पाणी पुरवठा करणाºया विहिरीची पाणी पातळी घटून तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर सिंचनासाठी होत असलेला उपसा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतने लघू सिंचन विभागाकडे निवेदन सादर करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतच्यावतीने जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर केले. त्यांनी त्याची तातडीने दखल घेत लघू सिंचन विभागाला सदर प्रकल्पातील उपसा बंद करण्याचे आदेश दिले. 

यंदा अपुºया पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील धरणांनी तळ गाठला आहे. त्यात मोहरी येथील प्रकल्पाचाही समावेश असून, याच प्रकल्पात गावाला पाणी पुरवठा करणाºया योजनेची विहिर आहे. आता प्रकल्पातून धडाक्यात पाणी उपसा होत असल्याने विहिरीच्या पातळीत घट होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच गावकºयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता लक्षात घेत ग्रामपंचायत सरपंच संजय गावंडे,  सदस्य विनायकराव मिसाळ, अ‍ॅड. मनिष म्हातारमारे यांनी लघू सिंचन उपविभागाच्या अभियंत्यांची भेट घेऊन प्रकल्पातून शेतीसाठी होत असलेला उपसा बंद करण्याची मागणी केली; परंतु सदर प्रकल्पातील पाणी उपसा बंद करण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच आणि पदाधिकाºयांनी याबाबत पुन्हा लघू सिंचन विभागाला निवेदन सादर केले; परंतु आम्हाला या प्रकल्पातील पाणी उपसा बंद करण्याचे आदेश नसल्याचे अभियंत्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच आणि पदाधिकाºयांनी तात्काळ वाशिम जिल्हाधिकाºयांकडे धाव घेत या प्रकाराची माहिती दिली आणि मोहरी प्रकल्पातून शेतीसाठी होत असलेला पाणी उपसा बंद करण्याबाबत निवेदनही सादर केले. जिल्हाधिकाºयांनी त्याची दखल घेत मोहरी येथील प्रकल्पातून होत असलेला सिंचन उपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश लघू सिंचन विभागाला दिले आहेत. त्यामुळे या प्रकल्पातील सिंचन उपसा बंद करण्याच्या हालचाली लघू सिंचन विभाकडून करण्यात येत आहेत. 

Web Title: Gram Panchayat take initative to stop irrigation practices in Mohari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.