Gram Panchayat election in Washim district | १८५ ग्रामपंचातमध्ये सदस्य; आठ ठिकाणी सरपंचपदासाठी होणार पोटनिवडणूक
१८५ ग्रामपंचातमध्ये सदस्य; आठ ठिकाणी सरपंचपदासाठी होणार पोटनिवडणूक


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील १८५ ग्रामपंचायतींमध्ये सदस्य; तर ८ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाकरिता पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार, संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यत अस्तित्वात राहणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार ६ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र १६ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतादरम्यान स्विकारले जाणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरु होईल. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. त्याचदिवशी दुपारी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास ८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येईल. मतमोजणी ९ डिसेंबर रोजी होईल व १२ डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असे कळविण्यात आले.

Web Title: Gram Panchayat election in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.