रिसोड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:58 IST2020-12-16T16:57:33+5:302020-12-16T16:58:33+5:30
Gram panchyat News ३४ ग्राम पंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा आॅगस्ट ते डिसेंबर २०२० या काळात संपत आहे.

रिसोड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले !
रिसोड : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत आला असून, या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. मोर्चेबांधणी वेगात असल्याने ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येते.
रिसोड तालुका हा राजकीय क्षेत्रात नेहमीच चर्चेत असतो. तालुक्यातील ३४ ग्राम पंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा आॅगस्ट ते डिसेंबर २०२० या काळात संपत आहे. कोरोनामुळे या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेंतर्गत येणाºया अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती केली होती. गत आठवड्यात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच, तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीयदृष्ट्या रिसोड तालुक्यातील निवडणुका या नेहमीच लक्षवेधी ठरतात. ग्रामपंचायत निवडणुकादेखील प्रतिष्ठेच्या मानल्या जात असल्याने तालुक्यात सध्या मोर्चेबांधणीने चांगलाच वेग धरल्याचे दिसून येते. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही महाविकास आघाडीने एकत्र लढविली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे ग्रामपंचायत निवडणूक एकत्र लढवतील, स्वतंत्र की स्थानिक पातळीवर आघाडी, पॅनल करून लढविली जाईल याबाबत तुर्तास काही निश्चित नाही. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सत्ताधाºयांसह विरोधकांनी मोर्चेबांधणीला वेग दिल्याचे दिसून येते.
या आहेत ३४ ग्रामपंचायती
रिसोड तालुक्यातील लोणी बु., करंजी, खडकी सदार, हराळ, केशवनगर, रिठद, चिचांबापेन, गोभणी, कंकरवाडी, केनवड, मसला पेन, व्याड, वाकद, वनोजा, आगरवाडी, चिंचाबाभर, देऊळगाव बंडा, नावली, नेतन्सा, पळसखेड, सवड, येवती, नंधाना, मांगुळ झनक, कवठा खु., चिखली, गोवर्धन, शेलू खडसे, करडा, बिबखेडा, मोठेगाव, गौंढाळा, एकलासपूर, मोप या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे.