एप्रिल महिन्याचे धान्य वाटपाचे दर, परिमाण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:40 IST2021-03-19T04:40:47+5:302021-03-19T04:40:47+5:30
मका व ज्वारीचा विक्री दर प्रति किलो १ रुपया आहे. तसेच गहू विक्रीचा दर प्रति किलो २ रुपये, तांदूळ ...

एप्रिल महिन्याचे धान्य वाटपाचे दर, परिमाण जाहीर
मका व ज्वारीचा विक्री दर प्रति किलो १ रुपया आहे. तसेच गहू विक्रीचा दर प्रति किलो २ रुपये, तांदूळ प्रति किलो ३ रुपये याप्रमाणे राहील. शेतकरी लाभार्थ्यांच्या वितरणात कोणताही बदल झालेला नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील विंचनकर यांनी कळविले आहे.
बदललेल्या धान्य वितरणानुसार अंत्योदय अन्न योजना अंतर्गत प्रति कार्ड ९ किलो गहू, ४.५ किलो मका, १.५ किलो ज्वारी, २० किलो तांदूळ व १ किलो साखरेचे वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत प्रति व्यक्ती १.८ किलो गहू, ९०० ग्रॅम मका, ३०० ग्रॅम ज्वारी, २ किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी लाभार्थी योजना अंतर्गत प्रति व्यक्ती ४ किलो गहू व १ किलो तांदूळ वितरित केले जाणार आहेत.