मासुपा महाविद्यालयात पदवीदान समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:27 IST2021-07-04T04:27:48+5:302021-07-04T04:27:48+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे उपस्थित होते. कोविड-१९ ...

Graduation Ceremony at Masupa College | मासुपा महाविद्यालयात पदवीदान समारंभ

मासुपा महाविद्यालयात पदवीदान समारंभ

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे उपस्थित होते. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अमरावती विद्यापीठाने पदवीदान समारंभ महाविद्यालय स्तरावर घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या प्रत्येकी पाच पदवीधर विद्यार्थ्यांना बोलावून पदवी वितरित करण्यात आली. इतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने ऑनलाइन प्रक्षेपण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. कला शाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉ. ए. वाय. अली, वाणिज्य शाखा अधिष्ठाता म्हणून डॉ. अविनाश निळे, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता म्हणून, डॉ. केसवानी यांनी भूमिका पार पाडली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. प्रस्ताविक प्राचार्य ठाकरे यांनी केले संचालन डॉ. अविनाश निळे यांनी केले. प्रा. महावीर धाबे यांनी आभार मानले.

Web Title: Graduation Ceremony at Masupa College